Header Ads

102 विद्यार्थी शिक्षणासाठी घेणार दत्तक ; संतोष पाटील | लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 102 व्या जयंतीच्या निमित्ताने उपक्रम

 
सांगली : साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या 102 व्या जयंतीच्या निमित्ताने शिक्षणासाठी दत्तक योजना चालू केली आहे,तरी सांगली शहरातील किंवा जिल्ह्यातील ज्या विद्यार्थी विद्यार्थिनीचे कोरोनामुळे दोन्ही ही पालक मृत्यू झालेल्या त्या कुटुंबातील व्यक्तीने किंवा त्या विद्यार्थ्यांनी दक्षिण शिवाजीनगर, चांदणी चौक, सांगली येथे संपर्क साधावा,असे आव्हान राज्य प्रवक्ता संतोष पाटील यांनी केले आहे.

 
गेल्या दोन-तीन वर्षापासून  सांगली शहरातील व सांगली जिल्ह्यातील ज्या विद्यार्थ्या व विद्यार्थिनीचे दोन्ही पालक कोविड च्या उपचार घेत असताना किंवा कोविडमुळे आईवडील दोघांचाही मृत्यू झाला असेल तर त्यांची मुले पहिली ते बारावी पर्यंतच्या शिक्षणासाठी दत्तक घेतली जातील,अशी माहिती सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते व मराठा स्वराज्य संघाचे राज्य प्रवक्ते संतोष पाटील यांनी सांगितले.
यावेळीला ज्येष्ठ नेते प्रकाश चौगुले, सुनील पिराळे, राजाभाऊ रामचेद्रे, सुधाकर नार्वेकर, राजू पेंढुरकर ,गोटखिंडी दादा, चंद्रकांत मालवणकर, गणपतराव कुरणेकर, गजानन पोतदार, पाटील मामा, सतीश निंबाळकर ,रवी काळेबेरे ,संजय काळेबेरे ,विशाल नार्वेकर, राजू कासार, संजय फल्ले सुनील रामचंद्र गवळी व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
Blogger द्वारे प्रायोजित.