Header Ads

बालगांव येथील अल्लमप्रभू देवाची यात्रा २२ ऑगस्ट पासून सुरुवात




बालगाव : बालगाव ता.जत येथील सालाबादप्रमाणे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री अल्लमप्रभू देवाची यात्रा दि. २२ ऑगस्ट रोजी भरणार असल्याची माहिती यात्रा कमिटी यांनी दिली आहे.यंदा मोठ्या प्रमाणात गावात विविध पाहुणे आलेले आहेत. मोठ, मोठे विविध साहित्य विक्रीचे स्टॉल लागले आहेत.यात्रेनिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.


यात्रे निमित्त अल्लमप्रभु व अमोगसिद्ध देवाची भेटीचा कार्यक्रम व कन्नड सामाजिक नाटक, भव्य कुस्त्यांचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.सोमवार रोजी पहाटे पाच वाजता गंध लेपन आणि दुपारी तीन वाजता पालखीचे भेटी कार्यक्रम आहे. ही यात्रा हळ्ळी व बालगाव या दोन्ही गावाचे लोक मिळून मोठ्या प्रमाणात साजरी करतात. हिंदू मुस्लिम लोकांचे एकमेव देवस्थान असून गावातील सर्व धर्माचे लोक मिळून यात्रा साजरी करतात.
Blogger द्वारे प्रायोजित.