Header Ads

ग्रामस्थांचा पाठलाग चुकविण्यासाठी चोरट्याने मारली विहिरीत उडी
सोलापूर :
 ग्रामस्थांचा पाठलाग चुकविण्यासाठी विहिरीत उडी मारलेल्या चोराचा मृत्यू  झाला आहे. १८ तासांनंतर चोराचा मृतदेह विहिरीबाहेर काढण्यात आला आहे. सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यातील सुलेखजवळगे या गावात घटना घडली आहे. या घटनेने गावात खळबळ उडाली आहे.
अक्कलकोट तालुक्यातील सुलेरजवळगे या गावात मध्यरात्री चोरटे शिरले. सुलेरजवळगे गावातील राहुल बगले आणि दादाराव चव्हाण यांच्या घरातील रोख रक्कम आणि दागिने पळविले आहे. बाहेर जाताना गावातील युवकांना माहिती झाल्यानंतर त्यांनी चोरांचा पाठलाग सुरू केला.


 त्यामुळे चोरी करायला गावात आलेले चोरटे घाबरले. ग्रामस्थांना घाबरून चोराने पळ काढला आणि गावातील एका विहिरीत उडी घेतली. मात्र, या चोरट्याचा विहिरीत जीव गेला. गावगावकऱ्यांनी पोलिसांना चोरट्यांनी विहिरीत उडी घेतल्याची माहिती दिली. जीवरक्षकांना बोलावून शोध घेण्यात आला. मोटारीच्या साहाय्याने पाणी काढून शोध घेतल्यानंतर तब्बल १८ तासांनी या चोराचा मृतदेह सापडला. त्यानंतर सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी मृतदेह पाठविण्यात आला आहे. मृत चोराची ओळख अद्याप पटू शकलेली नाही आहे.
Blogger द्वारे प्रायोजित.