Header Ads

भारताचा नकाशा साकारून विद्यार्थ्यांची क्रांतिकारकांना सलामी


सांगली : 
आजादी का अमृत महोत्सव आणि हर घर तिरंगा अभियानांतर्गत उपविभागीय अधिकारी कार्यालय विटा, बळवंत कॉलेज, विटा. विटा नगर परिषद विटा. यांच्या वतीने क्रांती ‍दिनी समूह राष्ट्रगीत अभियान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमामध्ये बळवंत कॉलेज विटा, विटा हायस्कूल विटा, मॉडर्न हायस्कूल विटा, महात्मा गांधी विद्यामंदिर विटा, आदर्श हायस्कूल विटा, संजय भगवानराव पवार ज्युनिअर कॉलेज या सर्व शैक्षणिक संस्थेतील जवळपास १२०० हून अधिक विद्यार्थ्यांनी केसरी, पांढरा, हिरवा व निळा पोशाख परिधान करून कार्यक्रमात सहभाग घेतला. यावेळी विद्यार्थ्यांनी भारताचा मानवी

नकाशा साकारून क्रांतिकारकांना सलामी दिली. यावेळी वरूण राजांनी हजेरी लावली.

            या कार्यक्रमासाठी प्रांताधिकारी संतोष भोर, तहसीलदार ऋषिकेत शेळके, पोलीस उपअधीक्षक संतोष डोके, मुख्याधिकारी मनोज देसाई, पोलीस निरीक्षक पांडुरंग कन्हेरे, माजी आमदार सदाशिवराव भाऊ पाटील, रयत शिक्षण संस्थेचे दक्षिण विभागीय अध्यक्ष माधवराव मोहिते, प्राचार्य साठे, विनोद गुळवणी. नगरपालिकेचे अधिकारी श्री. खामकर, श्री. सावंत तसेच विविध महाविद्यालयाचे विद्यालयाचे क्रीडा शिक्षक, सहकारी शिक्षक, विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते.

            विद्यार्थ्यांच्या सहभागाने अमृत महोत्सवच्या लोगोचे सादरीकरण करण्यात आले. प्रांताधिकारी संतोष भोर यांनी प्रत्येक व्यक्तीने दिनांक 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत राष्ट्रध्वज फडकविण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे आभार देविदास जाधव यांनी मानले. तहसीलदार कार्यालयाकडून सर्व सहभागी विद्यार्थी, शिक्षक, अधिकारी, पदाधिकारी यांना विविध रंगाच्या कॅप्स वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या 'वंदे मातरम् आणि 'भारतमाता की जय'  अशा घोषणांनी शाळेचा सर्व परिसर दनानून गेला.

 

Attachments area
Blogger द्वारे प्रायोजित.