Header Ads

रविवारी जतेत आझादी गौरव पदयात्रेचे नियोजन


जत : अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा श्रीमती सोनियाजी गांधी, कॉंग्रेसचे नेते राहुलजी गांधी,महाराष्ट्र प्रवेश काॅंग्रेस कमेटी अध्यक्ष नानाभाऊ पटोले, सांगली जिल्हा कॉंग्रेस कमिटी अध्यक्ष आमदार विक्रमसिंह सावंत यांचे आदेशानुसार भारत देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे होत असून संपूर्ण देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करणार आहे.यानिमित्ताने जत तालुका काँग्रेस पक्षाचे वतीने रविवार दिनांक १४ आगस्ट २०२२ रोजी जत तालुक्यात आझादी गौरव पदयात्रा आयोजित केली आहे. पदयात्रेची सुरूवात सकाळी दहा वाजता मार्केट यार्ड जत येथून माजी मंत्री बाळासाहेब ऊर्फ विश्वजित कदम,आमदार विक्रमसिंह सावंत, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटी उपाध्यक्ष विशाल पाटील, सांगली मिरज कुपवाड शहर जिल्हा कॉंग्रेस कमेटी अध्यक्ष मा.पृथ्वीराज पाटील, जयश्री पाटील आदी मान्यवर यांचे उपस्थित होणार आहे. तरी सर्व पक्ष पदाधिकारी,पक्षाचे सर्व  फ्रंटचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी रविवार दिनांक १४ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी दहा वाजता मार्केट यार्ड जत येथे पदयात्रेत सहभागी होण्यासाठी उपस्थित राहावे,असे आवाहन करण्यात आले आहे.


स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिवीरांचे स्मरण व्हावे, त्यांचे विचार नव्या पिढीने आत्मसात करावेत.देश स्वतंत्र करण्यामागे झटलेल्या त्या लाखो भारतीयांचे स्मरण करून स्वातंत्र्याचा हा अमृतमहोत्सव आणखी ऐतिहासिक करण्याचा काँग्रेसचा मानस आहे. या कार्याची माहिती नवीन युवकांना व्हावी या उद्देशाने पदयात्रा आयोजित केली आहे.कार्यक्रमाची नियोजन बैठक संपन्न झाली. बैठकीत जत तालुक्यात पदयात्रेचा मार्ग ठरविण्यात आला. पदयात्रेचे नियोजन पूर्वक तयारी करिता गुरुवार दिनांक ११ ऑगस्ट ते शनिवार दिनांक १३ ऑगस्ट अखेर प्रमुख पदाधिकारी जत तालुक्यात दौरा करण्याचे नियोजन झाले. यावेळी आप्पाराय्या बिराजदार, बाबासाहेब कोडग,सुजय ऊर्फ नाना शिंदे, तुकाराम माळी, महादेव पाटील, मोहनराव माने पाटील,निलेश बामणे,आकाश बनसोडे,मुन्ना पखाली,दिल्लीप धोत्रे, शरद जाधव.वसंत जाधव, जगधने आदि उपस्थित होते.
Blogger द्वारे प्रायोजित.