Header Ads

हर घर तिरंगा मोहिमेचा विटा शहरात सायकल रॅली व चित्ररथाव्दारे प्रचार


सांगली  : 
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हर घर तिरंगा मोहिमेच्या प्रचारासाठी विटा तहसील कार्यालयउपविभागीय अधिकारी कार्यालय विटानगरपालिका विटा व बळवंत कॉलेज विटा यांच्या संयुक्त विद्यमाने विटा शहरातून आज सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले.हर घर तिरंगा मोहिम प्रचार प्रसिद्धीकरिता काढण्यात आलेली सायकल रॅली बळवंत कॉलेज विटा येथून निघून पुढे शिवाजी चौकचौंडेश्वरी मंदिर विटा बाजार पेठक्रांतिसिंह नाना पाटील पुतळा मार्गे विटा हायस्कूल विटा येथे या रॅलीचा समारोप करण्यात आला. या सायकल रॅलीमध्ये सर्व प्रशासकीय प्रमुख तसेच बळवंत कॉलेजचे साधारणत: 300 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यातून विटा शहरातील नागरिकांनी दिनांक 13 ते 15 ऑगस्ट 2022 रोजी हर घर तिरंगा मोहिमेत सहभागी होऊन आपल्या घरावर तिरंगा फडकवण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच तहसील कार्यालयामार्फत या मोहिमेच्या प्रचार प्रसिद्धीकरिता चित्ररथ देखील वरील मार्गावरून फिरवण्यात आला.

Blogger द्वारे प्रायोजित.