Header Ads

माजी मंत्री जयंत पाटील यांच्या प्रयत्नातून मंजूर कामांचे भूमिपुजन
जत : माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे प्रयत्नातून तालुक्यातील शेतकरी व सर्व सामान्य जनतेसाठी दळण वळणाच्या सोयीच्या दृष्टीने मंजूर झालेल्या विविध विकास कामांचे भूमिपुजन करण्यात आले.


सिंदूर ते गुगवाड रस्ता खडीकरण डांबरीकरण (20 लाख), बिळूर खोजनवाडी रस्ता खडीकरण डांबरीकरण (15 लाख),बिळूर जिरग्याळ रस्ता पूल बांधणे व खडीकरण डांबरीकरण करणे ,वज्रवाड येथे सभागृह बांधणे इ. कामाचे भूमिपूजन करण्यात आले.यावेळी राष्ट्रवादी जिल्हा बँक संचालक प्रकाश जमदाडे, तालुकाध्यक्ष रमेश पाटील ,अमोल डफळे,जिल्हा उपाध्यक्ष बसवराज धोडमनी ,आप्पासो नामद ,अप्पासाहेब पाटील ,सिंदूर चे सरपंच गंगाप्पा हरुगेरी, चेअरमन जनागोंड ,उमराणीचे उपसरपंच संजय शिंदे ,राहुल डफळे सरकार,गुरुबसू कायपुरे,बसर्गी सोसायटीचे चेअरमन चंद्रकांत बामणे,संगय्या स्वामी ,अविनाश गडीकर ,बिळूरचे उपसरपंच अन्नू गडीकर ,सुरेश मुडसी, राजू हिप्परगी अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Blogger द्वारा समर्थित.