Header Ads

डफळापूर जिल्हा परिषद शाळेचे अमीन पखाली,चिन्मय कुलकर्णी तालुक्यात प्रथम


डफळापूर ; विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी व सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी जिल्हा परिषद सांगली शिक्षण विभागाच्या वतीने जिल्हाभर विविध शालेय स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये प्रामुख्याने कथाकथन,  वक्तृत्व, गायन,  लोकनृत्य, एकांकिका, इंग्लिश लँग्वेज काॅम्पीटीशन इत्यादी स्पर्धेचा समावेश करण्यात आला आहे.


 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जत नं 1  या ठिकाणी दिनांक 23ऑगस्ट 2022रोजी पंचायत समिती शिक्षण विभागामार्फत तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा संपन्न झाल्या. त्यामध्ये  उच्च प्राथमिक गटात 13 स्पर्धेक सहभागी झाले होते.  उच्च प्राथमिक गटात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नं 1 ङफळापूर चा विदयार्थी चि.अमीन मन्सूर पखाली यांनी प्रथम क्रमांक पटकावला.
दिनांक 24 ऑगस्ट 2022 रोजी पंचायत समिती शिक्षण विभागामार्फत तालुकास्तरीय गायन स्पर्धा संपन्न झाल्या. त्यामध्ये  उच्च प्राथमिक गटात 9 स्पर्धेक सहभागी झाले होते.  प्राथमिक गटात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नं 1 डफळापूर चा विद्यार्थी चि.चिन्मय गोविंद कुलकर्णी यांनी प्रथम क्रमांक पटकावला.दोन्ही विद्यार्थ्यांची जिल्हास्तरिय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.


Blogger द्वारे प्रायोजित.