जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी संकेत सरगर बरोबर व्हीडिओ कॉलव्दारे साधला संवाद
सांगली : इंग्लंडच्या बर्मिंगहॅममध्ये सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत रौप्य पदक पटकविणाऱ्या सांगलीच्या संकेत महादेव सरगर याच्याबरोबर जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी व्हीडिओ कॉलव्दारे संपर्क साधून मिळवलेल्या भरघोस यशाबद्दल अभिनंदन केले. तसेच त्याच्या प्रकृतीची विचारपूस करून भावी काळासाठी शुभेच्छा दिल्या.