Header Ads

रक्षाबंधन बहिण -भावाचे पवित्र बंधन लक्षात घेता वृक्षांशीही असंच घट्ट बंधन ठेवले पाहिजे




रक्षाबंधन हा सण भावाबहिणींचा सण म्हणून ओळखला जातो.राखीचा धागा साधासुधा नसुन अतुट बंधन आहे.भारतात सर्वच जातीधर्माचे लोक रक्षाबंधन मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरा करतात.यात भावाने बहिणीला दिलेले वचन अत्यंत महत्त्वाचे असते.पंचागानुसार श्रावण महिन्यातील म्हणजे राखी पौर्णिमा याला नारळी पौर्णिमा सुध्दा म्हणतात.हा सण भारतीय संस्कृतीच्या सणांमध्ये प्रमुख सण आहे.यामुळे बहिण-भावात उत्साहाचे वातावरण निर्माण होते.भारतात संपूर्ण राज्यात राखी पौर्णिमा वेगवेगळ्या पध्दतीने साजरी केली जाते.उत्तर भारतात कजरी पौर्णिमा,पश्चिम भारतामध्ये"नारळी पौर्णिमा"या नावाने हा सण साजरा केला जातो.पुराणात सांगितल्याप्रमाणे श्रावण पौर्णिमेला मोठ्यांचे आशीर्वाद पवित्र मानल्या जाते. पुर्वी मध्ययुगीन काळात भारतामध्ये बाहेरील आक्रमणापासून महिलांचे संरक्षण करण्यासाठी हा सण साजरा करण्यात येत असे.महाभारतात सुध्दा बहिणभावाचे अतुट बंधन दिसून येते.श्रीकृष्णाच्या हाताच्या बोटाला जखम होऊन त्यातून रक्त वाहत होते त्यावेळी पांडवांची पत्नी द्रौपदीने आपल्या साडीची किनार फाडून श्रीकृष्णाच्या बोटाला बांधली आणि त्यांचा रक्तस्राव थांबवला.तेव्हापासुन श्रीकृष्णाने द्रौपदीचे रक्षण करण्याचा संकल्प केला आणि आजीवन द्रौपदीचा भाऊ म्हणून तिचे रक्षण केले.म्हणजेच रक्षाबंधनाची परंपरा दैवी काळापासून आजपर्यंत सुरू आहे.यावरून हेच लक्षात येते की बहिणीच्या रक्षणासाठी भाऊ काहीही करायला तयार असतो.अशा इतिहासात अनेक गोष्टी आपल्याला पहायला मिळतात.  



चित्तोढगडची राणी कर्मावती हिने बहादुरशहा पासून आपली रक्षा करण्यासाठी मुघल बादशहा हुमायूला राखी बांधली होती.राखी बांधल्यानंतर राजा हुमायूने राणी कर्मावतीच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची बाजी लावली असे सांगण्यात येते.यावरून स्पष्ट होते की भाऊ आपल्या बहिणीच्या रक्षणासाठी "जान जाये पर वचन न जाये"अशी भूमिका बहिणीबद्दल भावांमध्ये दिसून येते. संपूर्ण भारतात रक्षाबंधन हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.रक्षाबंधन म्हणजे बहीण -भावाच्या अतुट बंधन.म्हणजेच बहिण-भावाच्या नात्याचा सुवर्ण महोत्सव.कारण यामुळे दोघांचेही प्रेम एकत्र येऊन भाऊ बहीणीला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो व कठीण प्रसंगी धावुन येण्याचे वचन देतो.यामुळे बहिण -भावाचे प्रेम अफाट असल्याचे दिसून येते.सध्या बहिण -भावाप्रमाणे आज वृक्षांना आपल्या बंधनात बांधण्याची नितांत गरज आहे.बहिणीने भावाला राखी अवश्य बांधावी परंतु सोबतच एक वृक्ष भेट देऊन त्यांची जोपासना करण्याचे वचनसुध्दा घ्यावे.कारण दिवसेंदिवस हवामानात बदल होतांना दिसत आहे.पुर्वी मुसळधार व संथ गतीने  पाऊस यायचा परंतु हवामानात बदल झाल्याने मुसळधार पाऊसाचे प्रमाण मोठ्याप्रमाणात वाढल्याचे दिसून येते व यामुळे ढगफुटीचे प्रमाणा सुध्दा वाढले आहे.


यामुळे मानवी हानी, शेतीचे नुकसान, समुद्राच्या पातळीत वाढ, सुनामी,भुकंप, वादळ,विजकोसळने,अती उष्णता,अती थंडी ह्या संपूर्ण घटना निसर्गाचे संतुलन डगमगल्याने निर्माण झाल्याचे दिसून येते.परंतु आपण येणाऱ्या संकटांशी सामना अवश्य करू शकतो.याकरीता रक्षाबंधनाच्या निमित्ताने संपूर्ण भारतात वृक्षारोपण व्हायला हवे.त्याचबरोबर बहिणीने भावाला किंवा भावाने बहिणीला काय मौल्यवान वस्तू भेट द्यायच्या आहेत त्या अवश्य द्याव्यात.परंतु बहिणीने भावाला व भावाने बहिणीला एक -एक वृक्ष भेट देऊन धर्तीमातेचे रक्षण करण्याचा संकल्प सर्वांनीच घेतला पाहिजे.यामुळे संपूर्ण भारतात हिरवागार गालिचा निर्माण होईल. येणारे पाऊसाचे पाणी जमिनीत मुरेल व  पृथ्वीचे संतुलन सुरक्षित राहील, ग्लेशियर वितळणे थांबेल, वणव्याचे प्रमाण कमी होईल,भुकंपावर आळा बसेल, अशाप्रकारे निसर्गावर येणारे संकट वृक्षलागवडीमुळे हळूहळू कमी होण्यास मोठी मदत होईल व निसर्ग प्रफुल्लित होईल.वृक्षलागवड सांस्कृतिक, सामाजिक,सण उत्सव, राष्ट्रीय कार्यक्रम, आंतरराष्ट्रीय कार्यक्रम अशा कोणत्याही मार्गाने होने अत्यंत गरजेचे आहे.कारण यामुळे पृथ्वीचे संतुलन स्थीर रहाण्यास मोठी मदत होईल व हवामानातील वाढता बद्दल यावर अंकुश लावण्यास सर्वांचा हातभार कामी येईल. 


त्याचप्रमाणे निसर्ग प्रफुल्लित रहाला तर देशात पर्यटनाला सुध्दा मोठी चालना मिळते.सध्या आपल्या जवळ जिवंत उदाहरण आहे ते म्हणजे श्रीलंकेचे.अनेक संकटातून जात असलेला श्रीलंका आपल्या आर्थिक सुधारणेसाठी पर्यटनाला महत्व देत आहे.कारण पर्यटन हेच त्यांचे आर्थिक माध्यम आहे.त्यामुळे रक्षाबंधनाचे औचित्य साधून बहिण-भावाने वृक्ष भेटीवर जास्त भर देण्याची गरज आहे.त्याचप्रमाणे सरकारने सुध्दा संपूर्ण सणांचे औचित्य साधून जास्तीत जास्त वृक्षलागवडीकडे लक्ष देण्याची गरज आहे.यामुळे पर्यटनाला चालना मिळेल व भारताचीही आर्थिक बाजू बळकट होईल.नारळी पौर्णिमा व रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा! 


 रमेश कृष्णराव लांजेवार मो.नं.9921690779, नागपूर

Blogger द्वारे प्रायोजित.