अमृतमहोत्सवी वर्ष लक्षात घेता प्रत्येकांनीच 15 ऑगस्टला आपल्या घरावर तिरंगा फडकवीला पाहिजे
शहिदांच्या आठवणी पुन्हा-पुन्हा जागृत व्हाव्यात व नवीन पिढीला शहिदांची,क्रांतिकारकांची आठवण निरंतर रहावी व इतिहास जागृत रहावा यादृष्टीकोणातुन अमृतमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने 15 ऑगस्टला प्रत्येक घरावर तिरंगा फडकवुन देशाची आन-बाण-शान उंचावण्यासाठी सर्वांनीच अग्रेसर रहायला हवे.कारण तिरंगा भारतासाठी व भारतातील प्रत्येक नागरिकांसाठी अनमोल रत्न आहे.कारण यातुनच क्रांतीची मशाल उदयास आली व 15 ऑगस्ट 1947 हा दिवस उजाडला.यात सुर्याचा प्रखर तेजोमय प्रकाश, चंद्राची शांतीमय प्रतीमा, लखलखत्या ताऱ्यांचे प्रकाशमय वातावरण निर्माण करणे आणि वायू देवतेच्या सहवासाने विराजमान होवून देशाच्या शुरवीरांना व क्रांतिकारकांना तिरंगा सांगतो की "मेरा देश महान" अमृतमहोत्सवी वर्ष पहाता महाराष्ट्रासह देशातील प्रत्येक राज्यांनी 15 ऑगस्टला एकाच दिवशी 75 लाख वृक्ष लावण्याचा निर्धार करावा.
यामुळे अमृतमहोत्सवी वर्ष अनंत काळापर्यंत सर्वांच्याच स्मरणात राहील व संपूर्ण भारतात आपल्याला हिरवागार गालिचा सर्वीकडेच दिसून येईल. 15 ऑगस्टला अमृतमहोत्सवाचे स्वागत करण्यासाठी आपल्याला संपूर्ण नद्यांचा खळखळाट ऐकु येईल, समुद्र देवता आपल्या लाटांच्या खुशीने स्वागत करेल अशा प्रकारे स्थल,जल,वायु देवता अमृतमहोत्सवी वर्षाचे स्वागतासाठी सज्ज आहे.देशातील वाढते प्रदुषण व दिवसेंदिवस कमी होत असलेले ऑक्सिजनचे प्रमाण यामुळे पृथ्वीतलावरील संपूर्ण जीवजंतु भयभीत आहे.याकरीता अमृतमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून महाराष्ट्रासह देशातील प्रत्येक राज्यांनी 15 ऑगस्टला एकाच दिवशी 75 लाख झाडे लावण्याचा संकल्प करावा.या वृक्षलागवडीमुळे देशातील वातावरण प्रफुल्लित होईल व आपले पुर्वज आशिर्वाद देतील आणि त्यांना अभिमान होईल की स्वतंत्र भारतात सर्वकाही ठीक आहे.वृक्षलागवडीमुळे गुरांना चारा, सर्वांना शुद्ध हवा व ऑक्सिजन मिळेल.आपल्या पुर्वजांनी अनेक कठीण प्रसंगांशी सामना करत 1947 ला देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले.आज भारताला स्वतंत्र होऊन 75 वर्षे पूर्ण होत आहे त्यानिमित्त्याने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.
त्या अनुषंगाने संपूर्ण भारतात जय्यत तयारी सुरू आहे.ही अत्यंत आनंदाची व स्वागतार्ह बाब आहे.देश स्वतंत्र करण्यासाठी अनेक थोर महात्मे, क्रांतिकारक,जहालवादी नेते,मवाळवादी नेते यांच्या एकसुत्री कार्यक्रमाने व बलीदानानेच 15 ऑगस्ट 1947 ला भारत स्वतंत्र झाला.त्यामुळेच आज आपण स्वतंत्र भारतात मोकळा श्वास घेतो आहे.त्याकाळी स्वातंत्र्यासाठी घरा-घरातुन आवाज बुलंद व्हायचा व स्वातंत्र्यासाठी संघर्षमय वातावरण निर्माण करून संपूर्ण युवावर्ग इंग्रजांशी लोहा घेण्यासाठी काहीही करायला तयार रहायचे.आज आपल्याला आपल्या क्रांतिकारकांचे, शहिदांचे,थोरमहात्म्यांचे अनुकरण करून त्यांनी मिळवुन दिलेल्या स्वातंत्र्याची आठवण म्हणून आणि देश स्वतंत्र होऊन 75 वर्षे पूर्ण होत असल्याचे पाहून प्रत्येकांनी 15 ऑगस्टला आप आपल्या घरावर तिरंगा फडकवीलाच पाहिजे असा प्रण देशाच्या 135 कोटी जनतेनी घेतला पाहिजे.असे जर झाले तर तिरंगा एवढ्या उंचावर गेलेला आपल्याला दिसेल की संपूर्ण जग आश्चर्य चकित होईल व म्हणतील खरोखरच भारत देश महान.कारण जगाच्या पाठीवर भारत असा एकमेव देश आहे की याठिकाणी अनेक धर्माचे, पंथाचे,जातीचे लोक एकोप्याने रहातात. जेव्हा -देशाच्या एकतेचा आणि अखंडतेचा प्रश्न येतो तेंव्हा -तेव्हा एकनिष्ठेने कार्य करतात.त्यामुळे अमृतमहोत्सवी वर्ष काय असते ही बाब भारतातील 135 कोटी जनता आप आपल्या घरावर तिरंगा फडकवुन जगाला आपली ऐकता अवश्य दाखवेल.कारण भारतातील छोटे-मोठे सर्वच जाणतात की देश स्वतंत्र करण्यासाठी शुरविरांना, क्रांतिकारकांना अनेक यातना सहन कराव्या लागल्या, बलिदान द्यावे लागले,फासावर जावे लागले तेव्हाच भारत स्वतंत्र झाला.
आपण शुरविरांना, क्रांतिकारकांना,थोरमहात्म्यां
रमेश कृष्णराव लांजेवार
मो.नं.9921690779, नागपूर.