Header Ads

नागपंचमी सण उच्च न्यायालयाच्या आदेशानू साजरी करा

सांगली : कोरोना कालावधीनंतर नागपंचमी सण मोठ्या प्रमाणात साजरा होणार आहे. हा सण साजरा करताना उच्च न्यायालयाच्या आदेशानुसारच नागपंचमी सणाचे आयोजन होईल यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने नियोजन करावे. नियोजनात प्रत्येक बाबींची सुक्ष्म पध्दतीने आखणी करावी. त्यासाठी आवश्यक नोडल अधिकारी, कर्मचारी यांची तातडीने नियुक्ती करावी. वन विभाग, पोलिस यंत्रणा व स्थानिक प्रशासन यांनी हा सण शांततेत व सुरळीत पार पडेल याबाबतची सर्वोतोपरी दक्षता घ्यावी. ज्या ठिकाणी आवश्यकता वाटेल तेथे जिल्हा प्रशासनाची तातडीने मदत घ्यावी, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिले.


जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक सभागृहात नागपंचमी सण आयोजनाबाबत आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी उपवनसंरक्षक निता कट्टे, अपर पोलीस अधिक्षक मनिषा दुबुले, वाळवा उपविभागीय अधिकारी डॉ. संपत खिलारी, शिराळा तहसिलदार गणेश शिंदे, सहायक वनसंरक्षक (वनीकरण) डॉ अजित साजणे, शिराळा पोलीस निरिक्षक सुरेश चिल्लावार, शिराळा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी योगेश पाटील, मानद वन्यजीव रक्षक अजितकुमार पाटील, निसर्ग प्रतिष्ठानचे डॉ. रविंद्र होरा, अंबामाता मंदिराचे अध्यक्ष संभाजी गायकवाड आदि उपस्थित होते.

Blogger द्वारे प्रायोजित.