Header Ads

राजकीय लोकप्रतिनिधीकडून बोलण्यावर मर्यादा गरजेच्या

लोकप्रतिनिधींनी कोणतेही भाष्य करतांना  प्रत्येकवेळी शंभरवेळा विचार करून भाष्य करावे.कारण एक चुकीचा शब्द लाखो लोकांचे मन दुखावु शकतात.तेच काम खासदार अधीररंजन चौधरी यांनी केले.यामुळे देशाच्या 135 कोटी जनतेच्या भावना दुखावल्याचे दिसून येते.जगाच्या पाठीवर भारत असा एकमेव देश आहे की ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चांगल्या, सोज्वळ व निर्मळ प्रकारच्या लाखो शब्दांचा भंडार आहे तरीही सांसद चौधरी यांची राष्ट्रपती यांच्या बाबतीत बोलतांना कशी काय जीभ घसरली असावी याचे मला आश्चर्य वाटते.

त्यांच्या वक्तव्यावरून असे वाटते की "उचल्ली जीभ लावली टाळ्याला".असे अनावधानाने बोलन लोकप्रतिनिधीला शोभा न देणारं आहे.भारताच्या इतिहासातील राष्ट्रपती पद हे सर्वोच्च पद आहे.भारताच्या तिन्ही सेनादलाचे नेतृत्व राष्ट्रपतींकडे असते.त्यामुळे या पदाची राजकीय दृष्ट्या अवहेलना होने म्हणजे मुर्खपणाच म्हणावा लागेल.कारण लोकसभा असो वा राज्यसभा यातील संपूर्ण सांसद (खासदार) हे 135 कोटी जनतेचे प्रतिनिधित्व करीत असतात. त्यामुळेच त्यांना लोकप्रतिनिधी सन्मान प्राप्त झालेला आहे.अधीररंजन चौधरी हे वरिष्ठ सांसद आहेत.अशा व्यक्तीने महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूजी यांचा "राष्ट्रपत्नी" असा अपमानास्पद शब्द वापरून राष्ट्रपतींचाच नाही तर संपूर्ण देशाचा अपमान झाल्याचे मी समजतो.

भारतात अनेक उच्च पद आहेत यात प्रधानमंत्री, लोकसभा अध्यक्ष, तिन्ही सेना प्रमुख  इत्यादी अनेक या संपूर्ण पदांच्या तुलनेत राष्ट्रपती पद हे देशाच्या उंच शिखरावरील असुन एक "मानाचा तुर्रा"आहे.त्याचबरोबर राष्ट्रपती पदाला देशाचा प्रथम नागरिक म्हणून संबोधले जाते.म्हणजेच 135 कोटी जनतेसाठी सर्वेसर्वा या नात्याची भुमिका राष्ट्रपतींची असते.भारतात बहुमोलाचे,सर्वोच्च व मानसन्मानाचे पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते अनेक क्षेत्रांतील नामांकित, कर्तबगार,शुरविरांना, शहिदांच्या नातेवाईकांना अशा अनेक मान्यवरांना प्रदान करण्यात येतात व त्याचा गौरव संपूर्ण भारतात मोठ्या ऐटीने करण्यात येतो.त्यामुळे आपण समजू शकतो की भारताचा राष्ट्रपती जेव्हा आपले पद ग्रहण करतो तेव्हा तो कोणत्याही जातीचा, धर्माचा,पंथाचा, राजकीय पक्षांचा व्यक्ती रहात नाही तर तो संपूर्ण देशाचा निर्मळ आणि स्वच्छ मनाचा देशाचा महान व्यक्ती असतो.म्हणुनच राष्ट्रपतींच्या समोर महामहीम असा शब्द वापरण्यात येतो.

त्यामुळे महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूजी यांची तुलना "राष्ट्रपत्नी" असा करून सांसद अधीररंजन चौधरी यांनी राष्ट्रपतींचाच नाही तर देशाचा व संसदेचा मोठा अपमान केला आहे.चौधरी यांचे वक्तव्य अत्यंत निंदनीय व घृणास्पद आहे.आक्षेपाचे वाढते प्रकरण पहाता शुक्रवारला राष्ट्रपतींना एक पत्र लिहून माफी मागितली आहे.पत्रामध्ये लिहिले आहे की, माझ्याकडुन अनावधानाने तुमच्या विषयी चुकीचा शब्द उच्चारला गेला.याबद्दल मी तुमची माफी मागत आहे.त्या माफीचा तुम्ही स्वीकार करावा,अशी विनंती अधीररंजन चौधरी यांनी राष्ट्रपतींना पत्राद्वारे केली आहे.अधीररंजन चौधरी यांनी राष्ट्रपतींना माफी मागितली हे ठीकच झाले.


परंतु जनतेला सुध्दा जाहीर माफी मागायला हवी.यानंतर कोणत्याही राजकीय पक्षाचा पुढारी असो अशा उच्च पदस्थ व्यक्ती बद्दल अपशब्द कोणी बोलला तर त्यावर कठोर कारवाईचे प्रावधान असावे असे मला वाटते.                                                          
रमेश कृष्णराव लांजेवार                      
(माजी विद्यापीठ प्रतिनिधी नागपूर) मो.नं.9921690779
Blogger द्वारे प्रायोजित.