Header Ads

पयोद इंडस्ट्रीजच्या वतीने महिलांना राष्ट्रध्वज बनविण्याचे प्रशिक्षण

कवठेमहांकाळ : भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर जनतेच्या मनात स्वातंत्र्य लढ्या विषयीच्या आठवणी तेवत राहाव्यात.स्वांतत्र्य मिळवून देणारे नायक,क्रांतिकारक,समाजसुधारक यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतानाच ७५ वर्षाच्या गौरवशाली परंपरेला मांडत प्रत्येकाच्या मनात देशाभिमान जागृत व्हावा,या उद्देशाने या दैदिप्यमान इतिहासाचे अभिमानपूर्वक संस्मरण करण्यासाठी दिनांक ११ऑगस्ट ते १७ ऑगस्ट २०२२ या कालावधीमध्ये केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार,' हर घर तिरंगा ' हा उपक्रम राबविण्यात येत आहे.यासाठी राष्ट्रध्वजाची विक्रमी मागणी तसेच विक्री होण्याची अपेक्षा आहे.
                   हीच मागणी लक्षात घेऊन हिंगणगाव येथील पयोद इंडस्ट्रीज या अभियानात भाग घेत असून केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार आणि भारतीय ध्वज संहिता २००६ नुसार कापडी ध्वज निर्मिती करणार आहे.तालुक्यातील ज्या महिलांना शिलाई मशीनचे कौशल्य प्रशिक्षण घेतलेले आहे आणि ज्यांच्याकडे शिलाई मशिन आहे अशा महिलांनी आपल्या घरावर फडकवण्यासाठी राष्ट्रध्वज स्वतः बनवावा यासाठी पयोद इंडस्ट्रीज राष्ट्रध्वज बनविण्याचे प्रशिक्षण देणार आहे.ध्वजाचे आवश्यक सर्व साहित्य पुरवणार आहे,यासोबत महिलांना पयोद इंडस्ट्रीज येथे दोन तासांचे राष्ट्रध्वज बनवण्याचे प्रशिक्षण देखील देण्यात येणार असल्याची माहिती पयोद इंडस्ट्रीजचे प्रमुख देवानंद लोंढे आणि स्नेहल लोंढे यांनी दिली आहे.
            सदर प्रशिक्षणास महिला राष्ट्रवादीच्या वतीने भेट देऊन महिला पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रध्वज बनविण्याच्या प्रशिक्षणासोबत इतर माहिती घेतली.यावेळी पयोद इंडस्ट्रीजचे प्रमुख देवानंद लोंढे,स्नेहल लोंढे,राष्ट्रवादी महिला आघाडीच्या कवठे महांकाळ शहराध्यक्षा मिनाक्षी माने,छाया शेजाळ,शोभा काटे,अरुणा ननवरे,सुधा सूर्यवंशी तसेच तालुक्यातून मोठ्या संख्येने इतर महिला उपस्थित होत्या.

Blogger द्वारे प्रायोजित.