Header Ads

बँक ऑफ महाराष्ट्रकडून महिला बचत गटांना 28 लाखाचे कर्ज वाटपआवंढी संकेत टाइम्स : आवंढी ता जत महिला स्वयंसहाय्यता समुह बचत गटाला विविध उद्योग करण्यासाठी २८ लाख रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले. 


कर्ज वाटप करतांना किराणा दुकान, पीठाची चक्की, फुलांचा व्यवसाय, , जनरल स्टोअर्स, झाडु बनवणे, दुग्ध व्यवसाय, शेळी पालन, मेंढी पालन, पत्रावळी व्यवसाय, कोंबडी पालन अशा प्रकारे अनेक व्यावसायाची निवड करण्यात आली. 
महिलांनी दुग्ध व्यवसाय यासह विविध व्यावसायातून आर्थिक परिस्थिती मजबूत करण्याबरोबरच आत्मनिर्भर होण्यासाठी  महाराष्ट्र बँकेच्या वतीने आवंढीतील 15 महीला बचत गटांना प्रत्येकी दोन ते तीन लाख या प्रमाणे 28 लाखांचे कर्ज वाटप करण्यात आले. 

ग्रामीण जीवनोन्नती अभियानातंर्गत बँकेने महीलांच्या सक्षमीकरणासाठी महत्वपूर्ण पाऊल उचलल्याबद्दल बचत गटाच्या महीलांनी आभार मानले आहे.यावेळी तालुका अभियान व्यवस्थापक अतिश कांबळे सर, प्रभाग समन्वयक आकाश कांबळे सर महाराष्ट्र बँकेचे बँक मॅनेजर, बँक सखी शीतल कोडग, CRP उषा बाबर , रतन कोडग व सर्व गटातील अध्यक्ष,सचिव व महिला उपस्थित होत्या .

Blogger द्वारा समर्थित.