Header Ads

संजय राऊत झुकणार नाही. शिवसेना सोडणार नाही. , ईडीनें ताब्यात घेतल्यानंतर राऊत यांची पहिली प्रतिक्रिया

मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना अंमलबजावणी संचालनालय विभाग (ईडी)ने ताब्यात घेतलं आहे. आज सकाळी सात वाजताच्या सुमारास ईडीच्या पथकाने राऊत यांच्या घरी छापा टाकला होता. पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून संजय राऊतांची ९ तास चौकशी करण्यात आली. पत्राचाळ व्यवहारात आर्थिक घोटाळा झाल्याचा आरोप राऊतांवर करण्यात आला होता. ईडीचं पथक संजय राऊतांना ताब्यात घेवून ईडीच्या कार्यलयाजवळ पोहोचले. त्यावेळी संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. 'मी सच्चा शिवसैनिक आहे, बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे. मी उद्धव ठाकरेंचा शिवसैनिक आहे. संजय राऊत झुकणार नाही. शिवसेना सोडणार नाही. , अशी पहिली प्रतिक्रिया राऊत यांनी ईडीने ताब्यात घेतल्यानंतर दिली आहे.


संजय राऊत म्हणाले, 'माझ्यावरील सर्व आरोप खोटे आहेत. फक्त शिवसेनेला त्रास देण्यासाठी आणि महाराष्ट्राला कमजोर करण्यासाठी हे सगळं दमनचक्र सुरू आहे. मी सच्चा शिवसैनिक आहे, बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे. मी उद्धव ठाकरेंचा शिवसैनिक आहे. मी लढणार. आम्ही लढू. महाराष्ट्र इतका कमजोर नाही आहे. शिवसेना इतकी कमजोर नाही आहे. खरी शिवसेना काय आहे, आज तुम्ही पाहत आहात. मी कोणाला घाबरत नाही'. तर यावेळी संजय राऊत यांनी 'राऊतांवरील कारवाईचा आनंद होत आहे' असे म्हणणारे शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांच्यावर देखील टीका केली. पेढे वाटा, महाराष्ट्र कमजोर होत आहे, अशी उपरोधिक टीका पत्रकारांच्या प्रश्नानंतर राऊत यांनी आमदार संजय शिरसाट यांच्यावर केली.


दरम्यान, ईडीचं पथक राऊतांना ताब्यात घेवून मुंबईच्या ईडी कार्यालयात पोहचले आहेत. याच पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी ट्विटरवर मोठी प्रतिक्रिया दिली आहे. तुम्ही त्या व्यक्तीचा पराभव करु शकत नाही, जो कधी हार मानत नाही. झुकणार नाही, जय महाराष्ट्र, असं ट्विट करुन राऊतांनी विरोधकांना सणसणीत इशारा दिला आहे.Blogger द्वारा समर्थित.