Header Ads

सोन्याळ | जनधनखाते नसणाऱ्यानाही मानधन द्या ; संतोष पाटील






सोन्याळ,वार्ताहर : देशात कोरोना आजारामुळे पुर्ण देशात लॉकडाऊनसह संचारबंदी करण्यात आली आहे. गोरगरीब मजूर, कष्टकरी,कामगार आणि ज्येष्ठ नागरिक आज घरात बसून आहेत.त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. केंद्र सरकारकडून जनधन खाते असलेल्यांना 20 कोटी रुपये  मदत करण्याचे जाहीर करण्यात आली आहे. यानुसार जनतेला प्रत्येकी 500 रुपये जनधन खात्यावर जमा होणार आहे. मात्र ज्यांचे जनधन खाते नाही अशांना आता सरकारच्या या  मदतीपासून मुकावे लागणार आहे. त्यामुळे ज्यांचे जनधन खाते नाही त्यांचे काय? असा सवाल अनेक नागरिक करीत आहे.अशा वंचित लोकांनाही योग्य पर्याय शोधून मानधन देण्याची मागणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती संतोष पाटील यांनी केली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकांना अर्थसहाय्य मिळावे,

प्रत्येकांकडे बँक खाते असावे,याकरिता 2016 साली प्रधानमंत्री जनधन योजना

अंतर्गत जनधन खाते सुरु करण्यात आले आहे.2016 पासून 2019 पर्यंत देशातल्या कोट्यवधी लोकांनी जनधन

खाते उघडली. मात्र ज्यांनी आतापर्यंत जनधन खात्यामध्ये आपली नोंद केली नाही.त्यांना आता कोरोनामुळे चांगलाच

फटका बसू लागला आहे.ग्रामीण आणि

शहरातील हजारोंच्या संख्येने अनेकांकडे जनधन खाते नाही.उलट बाहेर गेले की पोलिसांची भिती आहे. अनेक ग्रामीण भागातील आणि झोपडपट्यामधील लोकांना जनधन खात्यात अशा संकटाच्या काळात पैसा येणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे जनधन खाते नसणाऱ्यांची सध्या चिंता वाढली आहे. त्यांनाही याला पर्याय शोधून मानधन देण्यात यावे अशी मागणी पाटील यांनी केली आहे.




 


 

Blogger द्वारे प्रायोजित.