Header Ads

डफळापूर | सेवानिवृत्त कंमाडंर(CRPF)भाऊसाहेब वाघमारे यांचे निधन |


 

डफळापूर,वार्ताहर : डफळापूर ता.जत येथील भाऊसाहेब मारूती वाघमारे (सेवा निवृत्त सहाय्यक कंमाडंर,सीआरपीएफ)

यांचे वयाच्या 73 व्या वर्षी प्रदिर्घ आजाराने दिंनाक 11 एप्रिल 2020 रोजी सांय8.00 वा.दुःखद निधन झाले.

शालेय जीवनामध्ये उत्कृष्ठ व्हॉलीबॉलपटू म्हणुन परिचित होते. घरची परिस्थिती बेताची असलेने ते 28/5/1965 रोजी सीआरपीएफ सशस्त्र सैन्यामध्ये (सांगली)येथील भरती मेळाव्यात भरती झाले. शिपाई ते असिंटंट कंमाडर या पदापर्यंत त्यांनी सेवा बजावली होती. त्यांनी जम्मू काश्मीर,श्रीनगर,आसाम,पंजाब, बांगलादेश,गुजरात,ओडिसा, उतरप्रदेश,आयोध्या,शिलाँग,भुवनेश्वर . मुंबई,आदी ठिकाणी उत्कृष्ठ सेवा बजावली.त्यामुळे त्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानीत केले होते.पुणे तळेगांव कॅम्पस येथे ते असिं.कमाडेट या पदावरून दिं 31/5/2004 रोजी सेवानिवृत झाले.सेवा समाप्ती नंतर ही त्यांनी सामाजिक कार्याला वाहून घेतले. गांवातील विविध संस्थांनी, विजयसिंह डफळे हायस्कूल,जि.प.शाळा,ग्रा पं.बौद्ध सेवा संघ यांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला.त्यांनी डफळापूर ग्रा.प.तंटामुक्त कमिटीमध्ये काम केले.त्यांच्या पाश्चात पत्नी,मुली,मुले अनिल,सुनिल,राकेश, 6 नातवंडे व नातू पैलवान कुणाल वाघमारे  असा परिवार आहे.त्यांच्या पार्थिवावर शनीवारी सायकांळी शोकाकूल वातावरणात अत्यंसस्कार करण्यात आले.
 


 

Blogger द्वारे प्रायोजित.