संख | बसवराज पाटील युवा मंच संख कडून 5,000 मास्कचे वाटप |


संख | कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यभरात लॉकडाउन करण्यात आले आहे.जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार मास्क घालण्याचे बंधनकारक असल्याने संख येथील माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा राजारामबापू पाटील जुनियर कॉलेजचे संख संस्थापक बसवराज पाटील (काका) युवा मंच यांच्यातर्फे संख व संख परिसरात पाच हजार मास्क वाटप करण्यात आले.
गावांमध्ये घरोघरी,पोलिसांना मास्क वाटप करण्यात आले.
यावेळी अध्यक्ष तथा राजारामबापू पाटील व जुनिअर कॉलेजचे व्हाईस चेअरमन सुभाष पाटील,पोलीस पाटील सुरेश पाटील,उमेशकुमार पाटील,हवलदार सूनील गडदे,आमसिध्द खोत,दयगोंडा बिरादार,मलिकार्जुन सांयगाव व कार्यकर्ते उपस्थित होते.