Header Ads

| जत | जतमधील मंगळवार पेठेत हातगाडे,दुचाकीमुळे वाहतूक कोंडी


जतमधील मंगळवार पेठेत हातगाडे,दुचाकीमुळे वाहतूक कोंडी

 

 

जत,प्रतिनिधी : जत शहरातील मुख्य बाजार पेठ असणाऱ्या मंगळवार पेठेत रस्त्यावर उभ्या हातगाडे व दुचाकीमुळे वाहतूक कोंडी नित्याची बनली आहे.हातगाडे चालकांना व्यवस्थित जागा द्यावी,दुचाकीसाठी पार्किंग पट्टे मारावेत अशी मागणी होत आहे.
जत परिसरातील सुमारे 50 गावांची बाजार पेठ जतेत आहे.त्याशिवाय शासकीय कार्यालये व मोठे शहर असल्याने तालुक्यातील मोठ्या प्रमाणात नागरिक जतमध्ये येतात.त्यामुळे शहरात खरेदीसाठी मोठी गर्दी असते.मात्र शहरातील मुख्य रस्त्यावरील हातगाडे,अतिक्रमणे व दुचाकी हस्तावेस्त लावले जात असल्याने मोठी वाहतूक कोंडी होत आहे.हातगाडे चालक व दुचाकी थेट रस्त्याला घासून स्टॉल लावत असल्याने एकाचवेळी दोन वाहने जात नाही.त्यामुळे वाहतूक कोंडी नित्याची बनली आहे.यातून जाताना वाहने घासण्याची प्रकार सातत्याने घडतात.त्यातून अनेकवेळा दोन वाहन चालकांत वादावादीचे प्रकार घडले आहेत.त्यामुळे नगरपरिषदेने शहरातील मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणे काढावीत.त्याशिवाय हातगाडे चालकांना वाहतूकीला अडचण होणार नाही.अशा ठिकाणी जागा द्यावी.हस्तावेस्त दुचाकी लावणाऱ्यांना लगाम लावावा.त्यासाठी रस्त्यावर पार्किंग पट्टे मारावेत.नियम तोडणाऱ्या दुचाकी धारकांना दंडाची कारवाई करावी.तरचं शहरातील रस्ते मोकळे श्वास घेतील अन्यथा अपघाताचा धोका मानगुटीवर कायम राहणार आहे.

 

जत शहरातील मंगळवार पेठेत अस्तावेस्त पार्किंग व हातगाड्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे.
 


Blogger द्वारे प्रायोजित.