Header Ads

| येळवी | ओंकार स्वरूपाच्या बालकलाकारांनी जिंकली येळवीकरांची मने


 
ओंकार स्वरूपाच्या बालकलाकारांनी जिंकली येळवीकरांची मने

वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न

 

 

येळवी,वार्ताहर : येथील ओंकार स्वरूपा इंग्लिश मेडियम स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलनात बालचंमूनी सादर केलेल्या आदांनी उपस्थित पालकांसह नागरिकांची मने जिंकली.अगदी चित्रपटला शोभेल अशा कलाकृत्ती सादर केल्या. 

येळवी सोसायटीचे माजी चेअरमन पंचाक्षरी अंकलगी यांच्याहस्ते शुभारंभ करण्यात आला.

स्नेहसंमेलनातून विद्यार्थ्यांचा उत्साह वाढतो,कलागुणांना वाव मिळतो त्यांना प्रोत्साहीत केले पाहिजे, त्यांचे कौतुक केले पाहिजे, तरच विद्यार्थी विविध क्षेत्रात भरारी घेतात.चांगली संगत व चांगल्या सवयीने आयुष्याचे सोने होते,असे यावेळी मान्यवरांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले.

वार्षिक स्नेहसंमेलनाच प्रारंभ स्वागत गिताने करण्यात आला.उत्साहपूर्ण वातावरणात बहारदार हिंदी मराठी गिते,नाटकांनी कार्यक्रमात रंगत आणली. यातील सुरुवतीच्या गणपती गीताने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. सार्थक आवटे व समिक्षा वाणी यांचे इंग्रजीतुन भाषण ऐकुन सर्व जण आवाक् झाले.दरम्यानच्या आजच्या काळातील शिक्षणाचे महत्व पटवुन देणारे व स्वच्छ भारत अभियान (स्वच्छते विषयीचे महत्व पटवुन देणारया) तसेच लेकिन वाचनालय अभियान या नाटिकेने धमाल उडवून दिली. शेवटी दाखवलेल्या देशभक्तीपर  आय लव्ह माय इंडिया या गाण्याने भारतीय सैनिकांची आठवण करून दिली. नयनरम्य विद्युत रोषणाईने रंगमंच  सजविण्यात आला होता.शिवजयंत्ती निमित्त महिला रांगोळी स्पर्धेतील विजेत्या महिला प्रथम सौ.भाग्यश्री विजय पाटील,द्वितीय सौ.सविता सुभाष चव्हाण 

तृतीय सौ.सुषमा सर्जेराव साबळे,चतुर्थ सौ.ज्योती विनायक गाणमोटे यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली.यावेळी सरपंच विजयकुमार पोरे,उपसरपंच सुनिल अंकलगी,शंकर आवटे,सोसायटी सदस्य नितिन माने,ग्रामपंचायती सदस्य सुरेश आवटे,शशिकांत गानमोटे (महाराज),  बजरंग चव्हाण,रामकृष्ण गंगणे, यासह मान्यवर उपस्थित होते.सुत्रसंचलन व प्रास्ताविक संतोष पाटील यांनी,तर आभार संस्थेचे अध्यक्ष दिपक अंकलगी यांनी मानले. 

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहशिक्षिका सौ.जयश्री इंगळे,सौ.राजक्का सोनवणे,सहशिक्षक ज्ञानेश्वर शिंदे,सूरज मणेर याबरोबर शिक्षकेत्तर कर्मचाऱ्याचे सहकार्य लाभले.

 

 

येळवी ता.जत येथील ओंकार स्वरूपा इंग्लिश स्कूलच्या स्नेहसंमेलनाचे उद्घाटन करताना माजी चेअरमन पंचाक्षरी अंकलगी,चिमुकल्या मुलांनी सादर केलेल्या लक्षवेधक आदाकारी

 

 

दोन्ही फोटो वापरा
 


 

Blogger द्वारे प्रायोजित.