| जत | तालुक्यातील दोन पतसंस्था इडीच्या रडारवर | काळ्या पैशाची होणार चौकशी

 

जत,प्रतिनिधी : जत तालुक्यात झपाट्याने वाढत असलेल्या दोन पतसंस्था इडीच्या रडारवर आल्या आहेत.या पतसंस्थात मोठ्या प्रमाणात दोन नंबरचे पैसे असल्याची माहिती इडीपर्यत पोहचल्याचे वृत्त आहे. त्याशिवाय संस्थात झालेल्या कोट्यावधीच्या गैरव्यवहाराची चौकशी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दुष्काळी जत तालुक्यातील अनेक बड्याची कोट्यावधी कर चुकविलेली काळी कमाई या संस्थात वेगवेगळ्या नावाने ठेव स्वरूपात असल्याची शक्यता आहे.त्याशिवाय संस्थाच्या संचालक मंडळाच्या भानगडी,बोगस खर्च,बचत एंजन्टाच्या कमिशनवरचे कमिशन,विविध निधीतून काढलेला पैसा,बोगस कर्मचारी आदी विषय तालुक्यात चर्चेत आहेत.तालुक्यातील या दोन मोठ्या पतसंस्थाबरोबर मोठ्या प्रमाणात वाढलेल्या अशा पतसंस्था भष्ट्राचाराचे कुरण बनत आहेत.यापुर्वी तालुक्यात सुरू झालेल्या अनेक पतसंस्था दिवाळखोरीत निघाल्या आहेत.त्यात पोटाला पिळ देऊन ठेवलेल्या अनेक दुष्काळी शेतकरी,मजूरांच्या ठेवी आजही अडकल्या असताना,नव्याने असे प्रकार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे सहकार विभागाच्या वरिष्ठ कार्यालयाने यात लक्ष घालण्याची मागणी होत आहे.