Header Ads

| बिळूर | बिळूरमध्ये बेकायदा दारू अड्ड्यावर छापे


 
बिळूरमध्ये बेकायदा दारू अड्ड्यावर छाप

 

एक लाखाचा मुद्देमाल जप्त : दोघे संशयित फरारी

 

जत,प्रतिनिधी : बिळूर (ता. जत) येथे जतच्या उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या पथकाने केलेल्या दोन वेगवेगळ्या कारवाई करत विना परवाना देशी व विदेशी दारूचा एक लाख 240 रूपयांचा साठा जप्त केला आहे. गुरूवारी दि. 27 फेब्रुवारी रोजी रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.या कारवाईची जत पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. 

याप्रकरणी आनंदा चिदानंद आपराज उर्फ नंदू मुडेगोळ व मांतेश गुंडाप्पा धोडमणी (दोघेही रा.बिळूर, ता.जत) या दोघांविरोधात दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असून कारवाई दरम्यान दोघेही संशयित आरोपी फरार झाले आहेत. 

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पोलिस उपअधीक्षक दिलीप जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सुभाष कांबळे, पोलिस नाईक सुनिल व्हनकंडे यांचे पथक बिळूर येथे कारवाईस पाठविण्यात आले होते. 

बिळूरमध्ये बेकायदा दारू विक्री करणाऱ्या आनंदा आपराज यांच्या अड्डयावर छापा टाकला तेव्हा मॅक्डाॅल नंबर वन 180 मिली व्हीस्कीच्या बाटल्या विना परवाना विक्री करत होता. याठिकाणी 86 हजार 400 चा मुद्देमाल तर मांतेश धोडमणी यांने देशी संत्रा, टँगो पंंचच्या 180 मिलीच्या 104 बाटल्या, व्हिस्कीच्या 180 मिलीच्या 32 बाटल्या जप्त केल्या. त्याची एकूण 13 हजार 840 किंमत होते.अधिक तपास पोलिस करत आहेत.
 


Blogger द्वारे प्रायोजित.