Header Ads

जतमध्ये तूर खरेदी केंद्र सुरू करा : प्रकाश जमदाडे


 



जतमध्ये तूर खरेदी केंद्र सुरू करा : प्रकाश जमदाडे


जत,प्रतिनिधी : जत येथे शासनामार्फत तूर मार्फत तर खरेदी केंद्र सुरू करावे,अशी मागणी माजी सभापती प्रकाश जमदाडे यांनी शासनाकडे केली आहे,तसे निवेदन त्यांनी तहसीलदार सचिन पाटील यांना दिले. 

निवेदनात म्हटले आहे,सर्वाधिक क्षेत्र असलेल्या जत तालुक्यात 53 गावे खरीप व 67 गावे रब्बी पिकाखाली आहेत.साधारणपणे 6,5000 हेक्टर खरीप तर 45,000 हेक्टर रब्बीची पेरणी झालेली आहे.गेल्या 4-5 वर्षापासुन तालुक्यात शेतकरी हक्काचे पिक म्हणून मका व तूरीचे उत्पादन घेत आहेत.यावर्षी काही भागात पाऊस चांगला झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सुमारे 1हजार क्षेत्रावर तुरीची लागण केली आहे.पिके चांगली आहेत.शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळवून तूर देणार आहे. शासनाने तूरीचा हमीभाव 5,800 रु जाहीर केला आहे. परंतू व्यापाऱ्यांकडून 4 ते 5 हजार रूपये दराने दर पाडून तूरीची खरेदी केली जात आहे.त्यातच काटामारी,सुट यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. परिणामी पुर्व भागातील काही शेतकरी विजापूराच्या बाजारात तूर विक्री करत आहेत. त्यातही काटामारी होते.दर मात्र 5 हजाराच्या आसपास मिळत आहे.जत तालुक्यातील व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांचे नुकसान केले जात आहे. त्यामुळे जत तालुक्यात शासनाचे शासकीय हमीभाग दरानुसार तुर खरेदी केंद्र सुरू करावे,असे निवेदनात म्हटले आहे.यावेळी पंचायत समिती सदस्य रामाण्णा जिवाण्णावर, शिवाप्पा तावशी व पदाधिकारी उपस्थित होते. 

 

 

जत येथे तूर खरेदी केंद्र सुरू करावे या मागणीचे निवेदन देताना प्रकाश जमदाडे

 



 


 

Blogger द्वारे प्रायोजित.