Header Ads

महापालिकेकडून मारुती रोड, हरभट रोडवर अतिक्रमण मोहीम | रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्यांना वॉर्मिग | पुन्हा अतिक्रमण केल्यास कारवाई होणार


सांगली - महापालिकेकडून बुधवारी मारुती रोड, हरभट रोडवर अतिक्रमण मोहीम : यावेळी रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्यांना पथकाने वार्निंग देत पुन्हा रस्त्यावर अतिक्रमण केल्यास कारवाई करण्याचा इशारा दिला. मनपा आयुक्त सुनील पवार यांच्या सूचनेनुसार अतिक्रमण विभागाने कारवाई सुरू केली आहे.


सांगलीतील प्रमुख बाजारपेठेत रस्त्यावर होणारे वाढते अतिक्रमण लक्षात रस्त्यावरील अतिक्रमण हटवणेसाठी अतिक्रमण विभागाने कारवाई सुरू केली आहे. या अंतर्गत अतिक्रमण विभागाने कारवाईला सुरवात केली आहे. सोमवारी अनेक फलकावर कारवाई करीत बोर्ड जप्त केले. बुधवारी पुन्हा अतिक्रमण विभागाने मारुती रोड, हरभट रोडवर अतिक्रमण मोहीम राबवत रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्यांना पथकाने वार्निंग देत पुन्हा रस्त्यावर अतिक्रमण केल्यास कारवाई करण्याचा इशारा दिला. तसेच अतिक्रमण मोहीम अशीच सुरू राहील असा इशारा दिला. 

Blogger द्वारे प्रायोजित.