Header Ads

फॅबटेक टेक्निकल कॅम्पसमध्ये लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती साजरी


सांगोला: येथील फॅबटेक टेक्निकल कॅम्पसमध्ये  लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची १४७  वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल यांनी संपूर्ण देशाला एकात्मतेच्या धाग्यात बांधण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.  सरदार पटेल हे स्वातंत्र्यानंतर देशाचे पहिले उपपंतप्रधान आणि गृहमंत्रीही होते.  त्यांच्या मेहनतीमुळंच देशातील विविध संस्थानं भारतात विलीन झाली. त्यामुळेच वल्लभभाई पटेल यांची जयंती देशात राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरी केली जाते. 



२०१४  मध्ये प्रथमच राष्ट्रीय एकता दिवस साजरा करण्यात आला. फॅबटेक इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉ आर बी शेंडगे, अकॅडमिक डीन प्रा. टी एन जगताप, पॉलिटेक्निकचे प्राचार्य प्रा. शरद पवार,फार्मसीचे प्राचार्य डॉ.एस के बैस यांच्या हस्ते सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. हा कार्यक्रम संस्थेचे चेअरमन श्री भाऊसाहेब रुपनर, मॅनेजिंग डायरेक्टर श्री अमित रुपनर, कार्यकारी संचालक श्री दिनेश रुपनर, कॅम्पस डायरेक्टर श्री संजय अदाटे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला. 


फार्मसीचे प्रा. अमोल पोरे यांनी  राष्टीय एकता दिनाची सर्वाना शपथ देऊन  या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व समारोप केला.यावेळी सांस्कृतिक समन्वयक प्रा.अमोल मेटकरी,सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने  उपस्थित होते.


Blogger द्वारे प्रायोजित.