Header Ads

करेवाडीत अल्पवयीन मुलीचा गळफासाने आत्महत्या


संख : जत तालुक्यातील करेवाडी (कोंतवबोबलाद) येथील अल्पवयीन मुलगी कोमल अमोगसिध्द सरगर (वय १४ ) घरासमोरील झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना सकाळी ८ वाजता घडली.याबाबतची फिर्याद पोलिस पाटील शांताप्पा सिद्दराम शिंगाडे यांनी उमदी पोलीस ठाण्यात दिली आहे. मयत कोमल सरगर ही आईवडीला समवेत शेतात रहाते.सकाळी आई वडील शेतात कामासाठी गेले होते. आजी समवेत घरी होती.

आजी आत घरात असताना घरासमोरील कडीपत्ताच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली .आईवडील शेतातून मक्याची वैरण घेऊन घरी आल्यावर ही घटना उघडकीस आली. याची माहिती पोलिस पाटील शांताप्पा शिंगाडे यांना दिली. घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा केला.मृतदेहाचा पोस्टमार्टेम करण्यासाठी जत ग्रामीण रुणालयात पाठविला.पोस्टमार्टेम करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.अधिक तपास उपनिरीक्षक लक्ष्मण खरात करीत आहेत.
Blogger द्वारे प्रायोजित.