Header Ads

भिवर्गीत पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या ई केवायसीचे मार्गदर्शन


भिवर्गी :  मौजे भिवर्गी येथे पी एम किसान सन्मान निधी योजना अंतर्गत पात्र लाभार्थी यांचे ई केवायसी करणे कामी कृषि विभाग मार्फत प्रचार,प्रसिद्धी मोहीम राबविणेत आली. यावेळी उपस्थित गावातील शेतकरी यांना कृषि सहाय्यक एस.एस.कोटी.यांनी ई केवायसी बाबत सविस्तर माहिती देण्यात आली.त्यावेळी सरपंच मदगोंडा सुसलाद व ग्रामसेवक कोरे एस. एस.व ग्रापंचायत सदस्य,शेतकरी उपस्थित होते.


सरपंच मदगोंड सुसलादा म्हणाले की,  प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांना वार्षिक ६ हजार रुपये पेंशन मिळत आहे. अशा शेतकऱ्यांना पुढील हप्ता मिळण्यासाठी ई केवायसी करावी लागणार आहे.ई केवायसी हि शेतकरी स्वतः करू शकतात,तसेच ऑनलाईन सुविधा केंद्र,कॉमन सर्विस सेंटर.महा ई सेवा केंद्र इ. ठिकाणी जाऊन बायोमेट्रिक ई केवायसी करू शकतात.ई केवायसी स्वतः करण्यासाठी आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणे गरजेचे आहे.


आधार कार्ड ला मोबाईल क्रमांक लिंक नसेल तर आपण महा ई सेवा केंद्र किंवा कॉमन सर्विस सेंटर या ठिकाणी जाऊन बायोमेट्रिक ई केवायसी करून घ्यावी,त्यानंतरच आपला हप्ता आपल्या बँक खात्यावर जमा होणार आहे,असेही संरपच मदगोंडा म्हणाले.
Blogger द्वारे प्रायोजित.