Header Ads

सातत्य, प्रामाणिकपणाच उच्च शिक्षणात नोकरी,व्यवसायाची सधी देते | - चंद्रशेखर गोब्बी


जत : जत येथील राजेरामराव महाविदयालयामध्ये आयोजित "उच्च शिक्षणामधील नोकरी व व्यवसायाच्या संधी" या विषयावर  मा. श्री. चंद्रशेखर गोबी यांचे विशेष व्याख्यान झाले. विदयार्थ्यांनी अभ्यासामध्ये सातत्यता, चिकाटी आणि प्रामाणिकपणा या गुणांना. ब आत्मसात केले पाहिजे असे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले. उच्च शिक्षणाच्या माध्यमातून नोकरी व्यवसायाच्या विविध संधीची माहिती त्यांनी विद्यार्थ्यांना दिली.  महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. (डॉ) सुरेश एस. पाटील यांनी अध्यक्षीय भाषणात नोकरी किंवा व्यवसायामध्ये यशस्वी होण्याची गुपिते सांगीतली. तसेच प्रत्येक विद्यार्थ्याने आपले करीयर नियोजण स्वतः तयार करण्याच्याआवश्यकतेबर भर दिले.



महावि‌द्यालयाचे प्राचार्य प्रो. (डॉ) सुरेश एस. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. डॉ. सतिषकुमार पंडोळकर यांनी समन्वयक म्हणून काम केले. तसेच डॉ. एस. जी. गावडे, एच डी टोंगारे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.या उद्बोधन कार्यशाळेस महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी - विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Blogger द्वारे प्रायोजित.