Header Ads

शेगावमध्ये दांडिया प्रशिक्षणाचे आयोजन

 शेगाव : शेगाव (ता.जत)येथे मुली व महिलांनी दांडिया नृत्य शिकावे म्हणून चिंचविसावा येथे दांडिया प्रशिक्षणाचे आयोजन केलेले होते. प्रल्हाद बोराडे यांनी एस युनिक डान्स अकॅडमीचे मास्टर सुरज मनेर यांना प्रशिक्षण देण्यासाठी निमंत्रित केले होते. शेगावातील महिलांना ही तर सुवर्णसंधी पण परिसरातील आवंढी, डफळापूर येथील महिलांचा प्रतिसाद मिळाला. तीन दिवस प्रशिक्षण खूप उत्कृष्टरित्या पार पडले, प्रशिक्षणासाठी सौ.उज्वला बोराडे, श्रीमती संगीता शेडसाळे,सौ अश्विनी बुरुटे, सौ.भारती पट्टणशेट्टी, सौ.सुकन्या स्वामी आणि सारिका खिल्लारे यांनी परिश्रम घेतले. चिंच विसावा म्हटले की सांस्कृतिक व पारंपरिक कार्यक्रमाची मालिका विशेषकरून महिला व सर्वांच्या आकर्षण व चर्चेचा विषय होत आहे.
Blogger द्वारे प्रायोजित.