Header Ads

लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचा जतेत पुतळा उभा करावा


जत : सांगली जिल्ह्याचे सुपुत्र लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी लावणी व पोवाडे कथा कादंबरी लेखननीतून समाज प्रबोधनाची मोठं कार्य संपूर्ण भारतभर केले असून अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य हे परिवर्तनाला दिशा व चालना देणारे होते, दिन दलित मागासवर्गीय वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी व त्यांच्या हक्काची जाणीव करून देण्यासाठी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांनी सर्वत्र लोक भावना जागृत करून समाजाला न्याय मिळवून देण्याची व आपल्या व्यथा मांडण्याचे महान कार्य केले आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची महती व ख्याती पूर्ण भारतभर व भारताच्या बाहेर लोककलेतून पोहोचवण्याचे महान कार्य केले आहे. 


त्यामुळे आजही बरीचशी विद्वान व विद्यार्थी अण्णाभाऊ साठे यांच्या वरती अभ्यासात्मक पीएचडी करतात.अशा या महान लोक कलावंताचा पुतळा जत नगरपरिषदेच्या मालकीच्या हद्दीत थोरलीवेस जवळ वाचनालयाच्या बाजूला उपलब्ध असणाऱ्या जागेत अण्णाभाऊंचा पुतळा व उद्यान उभारून लोक कलावंताचा सन्मान करावा अशी मागणी निवेदनाद्वारे प्रांताधिकारी यांचेकडे करण्यात आली आहे. यावेळी संजय कांबळे,विकास साबळे,संजय कांबळे पाटील व पदाधिकारी उपस्थित होते.
Blogger द्वारे प्रायोजित.