Header Ads

महानिंग तात्यांना वाढदिनी शुभेच्छाचा वर्षावडफळापूर,संकेत टाइम्स ; डफळापूर ता.जत येथील जेष्ठ हॉटेल व्यवसायिक महानिंग 
तात्या महाजन यांच्या 83 व्या वाढदिनी शुभेच्छाचा वर्षाव करण्यात आला.गेल्या तीस-चाळीस वर्षापासून डफळापूरातील चोखदळ खवव्यासाठी हॉटेल मनोहरमधून सेवा देत असलेले महानिंग तात्या यांचा 83 वा वाढदिवस प्रवृणी ठरला.येथील सर्व स्तरातील मान्यवरांनी थेट भेटून,सत्कार करत दिर्घायुष्याचा शुभेच्छा दिल्या.


अनेक मान्यवरांनी महानिंग तात्या यांचे सत्कार केले.संध्याकाळी महाजन कुंटुबियाच्या वतीनेही तात्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.लोकनेते सुनिलबापू चव्हाण यांचे चिंरजिव हर्षवर्धन चव्हाण यांनी तात्यांचा शाल,श्रीफळ,पुष्पहार व केक कापून वाढदिवस साजरा केला.


यावेळी विविध मान्यवर उपस्थित होते.सकाळी बाजार समिती संचालक अभिजीत चव्हाण,सोसायटी संचालक बाळासाहेब चव्हाण यांनी तात्यांचा फेटा बांधून सत्कार केला.अनेक मान्यवरांनी तात्यांचा सत्कार केला.ग्राहकांनी शुभेच्छा देत,दिर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या.तात्यांची चिरजिंव रमेश महाजन यांनी सर्वाचे स्वागत केले.डफळापूरचे जेष्ठ हॉटेल व्यवसायिक महानिंग महाजन यांचा सत्कार करताना हर्षवर्धन चव्हाण,सागर चव्हाण,महमद शिंदे,सदाशिव कोळी(खलाटी) व मान्यवर
Blogger द्वारे प्रायोजित.