Header Ads

सांगली जिल्ह्यातील नऱ्या घाडगे टोळी तडीपार


सांगली : खूनाचा प्रयत्न, खंडणीसारखे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या आष्टा (ता. वाळवा) येथील नरेंद्र उर्फ नऱ्या जालिंदर घाडगे टोळीला सांगली, सातारा व कोल्हापूर या तीन जिल्ह्यातून तडीपार करण्याचे आदेश जिल्हा पोलिस प्रमुख दीक्षीत गेडाम यांनी सोमवारी दिले. या टोळीवर पाच गंभीर गुन्हे दाखल आहेत.


टोळी प्रमुख नरेंद्र ऊर्फ न-या जालिंदर घाडगे ( वय ३०), रणजीत संभाजी घाडगे (३४), संतोष आनंदा आलदर (२२, तिघे रा. घाडगे मळा, आष्टा), अवधुत सुरेश परीट (२०), सागर बसाप्पा कोळी (२९, दोघे रा. परीट गल्ली आष्टा), प्रताप ऊर्फ प्रतिक बाबासाहेब कांडगावे (२९, रा. दुधगांव, ता.मिरज) अशी तडीपार केलेल्यांची नावे आहेत.  

या टोळीविरुद्ध २००८ ते २०२२ या कालावधीत खूनाचा प्रयत्न, खंडणी, घातक हत्याराने दुखापत पोहचविणे, बेकायदेशीर जमाव जमवून लोकांना शिवीगाळ, दमदाटी, मारहाण करणे, असे गंभीर स्वरुपाचे ५ गुन्हे आष्टा पोलीस ठाण्यात दाखल आहेत. या टोळीविरुद्ध आष्टा पोलीसांनी तडीपाराचा प्रस्ताव जिल्हा पोलिस प्रमुखांकडे सादर केला होता. या टोळीला तीन जिल्ह्यातून तडीपार करण्याचे आदेश अधिक्षक गेडाम यांनी दिले.

या कारवाईमध्ये पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, निरीक्षक अजित सिद, सहाय्यक फौजदार सिद्धाप्पा रुपनर, हेड काॅन्टेबल संजय पाटील, दीपक गाडे, अवधुत भाट यांनी भाग घेतला. 
Blogger द्वारे प्रायोजित.