Header Ads

कों. बोबलाद प्राथमिक आरोग्य केंद्राची चौकशी करा




कोंतेबोबलाद : जत तालुक्यातील कर्नाटक सीमेवरील को. बोबलाद प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी हे सोलापूर येथून कारभार करत आहेत आठवड्यातून एक दिवस दर सोमवारी फक्त उपस्थित राहतात,या अधिकाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी विक्रम ढोणे यानी केली आहे.
संबधित बेजबाबदार वैद्यकीय अधिकारी यांना हटवण्याची ग्रामस्थांची मागणी केली आहे.जिल्हा प्रशासनाने याबाबत योग्य ती कार्यवाही करावी.

दिनकर पंतगे यांची निवड

जत : जेष्ठ समाजसुधारक दिनकर पंतगे यांची माहिती अधिकार पत्रकार संरक्षण महासंघ पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
संघाचे राज्याध्यक्ष सलीम शेख यांनी निवडीचे पत्र दिले.


गंधर्व नदीवरील लोखंडी पुल धोकादायक 

जत : शहरातील गंधर्व नदीवरील लोखंडी पुल हा १९१२ मध्ये बांधण्यात आला असून १०० वर्षापूर्वीचा असून त्याची स्ट्रक्चल ऑडिट करण्याची मागणी राहुल शिंदे यांनी जत नगरपरिषदेकडे जून २०२१ मध्ये केली होती.लोखंडी पुलवरून अवजड वाहतूकीसाठी वापरण्यास अयोग्य असल्याचा अहवाल वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग च्या समितीने दिला आहे.


तालुक्यातील रस्त्यावरील खड्डे भरावेत

जत : जत तालुक्यात गेल्या महिन्या भारत पडलेल्या पावसामुळे अनेक रस्त्यावर मोठे मोठे खड्डे पडले आहे.संबधित विभाग ठेकेदार कसे काम करतात,हे पुन्हा स्पष्ट झाले आहे.जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांनी तालुक्यातील खड्डे भरण्याचे आदेश द्यावेत,अशी मागणी कॉ.हणमंत कोळी यांनी केली आहे.
Blogger द्वारे प्रायोजित.