Header Ads

आंवढीत बाळूमामा मंदिरांच्या सभामंडपाचे लोकार्पण

- आंवढी(हणमंत बाबर) 


आवंढी ता.जत येथे श्री.संत बाळुमामा नगर मधील आमदार विक्रमसिंह सावंत याच्या स्थानिकविकास निधीतुन बांधण्यात आलेल्या सभामंडपाचा लोकार्पण सोहळा पार पडला.बाळुमामा नगर येथे बाळुमामा मंदिर ,खंडोबा मंदिर आसल्याने याठिकाणी कायमच भाविकांची येजा सुरु असते.त्यामुळे भाविक भक्तांच्या सोयीसाठी सभामंडमाची गरज आसल्याचे भारत महाराज कोडग यांनी आमदार साहेबांकडे सभामंडपाची मागणी केली होती.त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला होता,त्याचे बांधकामही पुर्ण झाले आहे. 


श्री.संत बाळुमामाच्या पुण्यतीथी कार्यक्रमाचे औचित्य साधुन पालखीची मिरवणुक, रेवनाळ येथील गजीढोल न्रत्याचा कार्यक्रम ,पुष्पव्रष्टि , महाप्रसाद आशा कार्यक्रमांनी हा सोहळा पार पडला.यावेळी माजी सभापती बाबासाहेब कोडग, राजेंद्र माने सर, माजी उपसरपंच डॉ. प्रदिप कोडग ,अनिल कोळी ,सतिश कोडग , चंद्रकांत कोडग,रामचंद्र कोडग , लालासो देशमुख, बबन कोडग, राजू कोडग, महेश कोडग व  परिसरातील भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Blogger द्वारे प्रायोजित.