Header Ads

एकाच कुटूंबातील पाच जणांचा बुडून मृत्यू
नांदेड : जिल्‍ह्यातील कंधार इथे जगतुंग तलावात बुडून पाच जणांचा मृत्यू झाल्‍याची दुर्देवी घटना घडली आहे. मृतांमध्ये दोन सख्खे भाऊ व तीन चुलत भाऊ आहेत. ही घटना आज दुपारी उघडकीस आली

नांदेड शहरातील खुदबेनगर येथील रहिवासी असून ते कंधारच्या दर्ग्याला दर्शनासाठी रिक्षातून पाचही जण आले होते. महिला मुले दर्ग्यात थांबले होते. तर पाच जण तलावात पोहण्यासाठी उतरले होते. पोहत असताना तलावातील पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. स्थानिक नागरिकांनी पाचही जणांचे मृतदेह बाहेर काढले आहे. 


घटनेची माहिती मिळाल्‍यानंतर पोलिस देखील घटनास्थळावर पोहचले आहेत. मृतांमध्‍ये मोहम्मद विखार, मोहम्मद साद मोहम्मद शफीयोद्दीन, सय्यद सोहेल, मोहम्मद शफीयोद्दीन मोहम्मद गफार, सय्यद नविद सय्यद वहीद यांचा समावेश आहे. दरम्यान, या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Blogger द्वारे प्रायोजित.