Header Ads

चेअरमनपदामुळे जबाबदारी वाढली; विनायक शिंदे | शिवशंभो मल्टिस्टेटकडून सत्कार


जत,संकेत टाइम्स : प्राथमिक शिक्षक बँकेच्या चेअरमनपदी निवड झाल्याने माझ्यावरील कामाची जबाबदारी वाढली आहे.सर्वांना सोबत घेऊन शिक्षकांचा विकास,शाळासह शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यास माझे प्राधान्य राहिल,असे प्रतिपादन शिक्षक बँकेचे नुतन चेअरमन विनायक शिंदे (बेवनूर) यांनी केले.

शेगाव ता.जत येथील शिवशंभो मल्टिस्टेट निधी बँकेच्या वतीने शिंदेसह नव्या संचालकांचे सत्कार करण्यात आले.शिंदे पुढे म्हणाले,गेली १५ वर्षे मी शिक्षक बँकेचा प्रतिनिधी म्हणून काम पाहिले आहे.शिक्षकांच्या विविध अडचणी व प्रश्नावर आजपर्यत आवाज उठविला आहे.त्यांचे फळ‌ म्हणून शिक्षकांनी बँकेचे आमच्या पँनेलला मोठा विजय मिळवून दिला आहे. यापुढेही मी शिक्षकांच्या समस्यासाठी लढत राहिन,असेही शिंदे म्हणाले.

यावेळी नुतन संचालक फत्तुसो नदाफ(सोन्याळ),गांधी चौगुले(उटगी),एम.बी.चव्हाण यांचाही सत्कार करण्यात आला.यावेळी शिवशंभो मल्टिस्टेटचे चेअरमन लक्ष्मण बोराडे,संचालिका सौ.कांचनताई बोराडे,गणपतराव बोराडे,महादेव माने,डॉ.शिवाजी खिलारे,शहाजी गायकवाड,शहाजी बोराडे,रामचंद्र शिंदे,आर.टी.शिंदे,संतोष पोतदार,डॉ.हिवरे,कुमार बोराडे,माणिक कोडग आदी मान्यवर,सभासद,ग्रामस्थ शिवशंभो मल्टिस्टेटचे कर्मचारी उपस्थित होते.
स्वागत व प्रस्तावित लक्ष्मण बोराडे यांनी तर आभार लवकुमारे मुळे यांनी मानले.
Blogger द्वारे प्रायोजित.