Header Ads

धक्कादायक | रुग्णावर उपचार करण्यासाठी १ हजार रूपये लाचेची मागणी | या प्राथमिक आरोग्य केंद्राचा वैद्यकीय अधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात


जत,संकेत टाइम्स : रूग्णावर उपचार करण्यासाठी १००० हजार रूपयाची लाच स्विकारताना बिंळूर प्राथमिक आरोग्य केंद्राचा वैद्यकीय अधिकारी प्रमोद मारूती कांबळे,(वय ४६,रा.शिवाजी पेठ,जत) याला रंगेहात पकडण्यात आले आहे.सांगली लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने हि कारवाई केली आहे.

तक्रारदार यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र बिळूर येथिल डॉक्टर कांबळे यांनी उपचार करण्यासाठी ५०० रूपये लाचेची मागणी केली असल्याबाबतचा तक्रारी अर्ज दि.२९ जूलेै २०२२ रोजी अॅन्टी करप्शन ब्युरो सांगली पथकास दिला होता.तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दिनांक २९ जूलै २०२२ रोजी ब्युरोच्या कार्यप्रणालीप्रमाणे पडताळणी केली असता त्यामध्ये कांबळे डॉक्टर यांनी तक्रारदार व त्यांची पत्नी यांचेवर उपचार करण्यासाठी ७०० रूपये व तक्रारदार यांचे मित्राचा मुलगा यांचेवर उपचार करण्यासाठी ३०० असे एकूण १००० रूपये लाचेची मागणी केली असल्याचे निष्पन्न झाले.

त्यानंतर लागलीच प्राथमिक आरोग्य केंद्र बिळूर ता.जत जि. सांगली येथे सापळा लावला असता लोकसेवक प्रमोद मारूती कांबळे, वैद्यकीय अधिकारी यांनी तक्रारदार व त्यांची पत्नी तसेच तक्रारदार यांचे मित्राचा मुलगा यांचेवर उपचार करण्यासाठी म्हणून तक्रारदार यांचेकडे ७०० रूपये व तक्रारदार यांचे मित्राच्या मुलाकडे ३०० रूपये असे एकूण १००० रूपये लाच रक्कम स्विकारल्यानंतर त्यांना रंगेहात पकडण्यात आले आहे.जत पोलीस स्टेशन येथे लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियमाखाली कांबळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरु आहे.सदरची कारवाई उपआयुक्त राजेश बनसोडे,अपर पोलीस अधिक्षक सुरज गुरव यांचे
मार्गदर्शनाखाली उप अधीक्षक सुजय घाटगे, पोलीस निरिक्षक दत्तात्रय पुजारी, विनायक भिलारे यांच्या पथकांने करवाई केली.

Blogger द्वारे प्रायोजित.