Header Ads

माडग्याळ पंचायत समिती गणातून सचिन निकम यांची दावेदारी

माडग्याळ,संकेत टाइम्स : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीचे बिगुल वाजले आहे.त्यात रंगत वाढत असताना जत तालुक्यात माडग्याळ पंचायत समिती गणातून पदवीधर संघटनेचे राज्य कार्यध्यक्ष अभ्यासू युवा नेते सामाजिक कार्यकर्ते सचिन निकम यांनी निवडणूक लढवावी अशी जनतेतून मागणी आहे.

सचिन निकम यांनी मुख्यमंत्री ग्रामपरिवर्तक म्हणून शासनाच्या विविध विकास योजना,जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद,पंचायत समिती, तहसील व ग्रामपंचायत या सर्वांशी समन्वय साधून शाकीय योजना व निधी तसेच कृषी, शिक्षण,आरोग्य, महिला सबलीकरण,युवक कल्याण,रोजगार,स्वच्छता व नागरिकांच्या मुलभूत गरजा या संदर्भात राज्यातील विविध भागात विदर्भ,मराठवाडा कोकण व पश्चिम महाराष्ट्र येथे आदिवासी दुर्गम ग्रामीण भागात विकासामध्ये काम केले आहे.

तसेच त्यांचा मतदार संघातील नागरिकांशी व्याख्यान व विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून संपर्क आहे.सचिन निकम हे महाराष्ट्र पदवीधर संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष म्हणून काम करत आहेत.या  माध्यमातून युवकांचे प्रश्न सोडवणे,युवकांना मार्गदर्शन करणे,पदविधारांचे प्रश्न शासन दरबारी मांडणे ही सर्व कामे त्यानी ताकदीने केले आहेत.भारतीय जनता पक्षाने त्यांच्या या सर्व अनुभवाचा विचार करून उमेदवारी द्यावी.
तसेच त्यांच्या अनुभवाचा उपयोग या गणातील जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी होईल. माडग्याळ पंचायत समिती गणाच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांच्या उमेदवारीची जनतेतून मागणी होत आहे.

Blogger द्वारा समर्थित.