Header Ads

शासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची दिवाळी संपेना

जत,प्रतिनिधी :  दिवाळी झाली असली तरी अनेक शासकीय कार्यालयामधील अनेक कक्ष अधिकारी, कर्मचारी वेळ हाेऊनही उपस्थित नसल्याचे विविध शासकीय कार्यालयातील पाहणीवरुन दिसून आले. यावेळी उपस्थित कर्मचाऱ्यास साहेब आले नाही का विचारणा केली असता त्याने मात्र चुप्पी साधली हाेती.

जत शहरातील तहसील, पंचायत समिती, तहसील कार्यालय, उपनिबंधक कार्यालय, भूमि अभिलेख कार्यालय, नगरपरिषद कार्यालयाची सकाळी 10 ते 12 पर्यत पाहणी केली असता अनेक कर्मचारी कर्तव्यावर आलेच नसल्याचे दिसून आले. यासंदर्भात कायार्लयात हजर असलेल्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यास विचारणा केली असता साहेब आले नसल्याचे सांगण्यात आले. दिवाळी संपल्यानंतरही अधिकारी, कर्मचारी वेळेवर हजर राहत नसताना संबधितांचे मात्र याकडे दुर्लक्ष दिसत आहे.
Blogger द्वारे प्रायोजित.