जतेत 20 नवे रुग्ण | तिघाचा मुत्यू ; डफळापूरमध्ये 4 पॉझिटिव्ह

 

जत,प्रतिनिधी : जत तालुक्यात गुरूवार ता.17 ला जत शहराची चिंता वाढविणारा कोरोना बाधित आकडा समोर आला आहे.तालुक्यात गुरूवारी पुन्हा तिघांचा कोरोनामुळेे मुत्यू झाला आहे. शहरात गुरूवारी पुन्हा तब्बल 20 रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत.त्या खालोखाल डफळापूरात 4 कोरोना बाधित आढळून आले आहे.

 


त्याशिवाय संख 2,बेळोंडगी 1,आंसगी जत 1,सिध्दनाथ 1,कंठी 1 असे गुरूवारी एकूण 30 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळून आहेत.जत शहरातसह डफळापूर कोरोना बाधित संख्या वाढली आहे.जत तालुक्यात गुरूवारी तिघांचा कोरोनामुळे मुत्यू झाला आहे