Header Ads

तुकाराम माळी यांचा समाज "दासोही" पुरस्काराने सन्मान 

 


 

जत,प्रतिनिधी : लातूर येथे झालेल्या शरण गौरव व आनंदोत्सव सोहळ्यात जत येथील तुकाराम माळी सर यांना "समाज दासोही" पुरस्काराने गौरविण्यात आले.स्वतःसाठी तर सर्वच जगतात; परंतु जे इतरांसाठी व समाजासाठी जगतात तेच खरे इतिहासाचे 'नायक' होतात, समाज अशाच सद्गुणी लोकांना स्मरणात ठेवतो व त्यांच्या कार्यास वंदन करीत असतो.म्हणून आपण सर्वजण बसवादी शरणांच्या वचन विचारांच्या प्रसारासाठी अथक परिश्रम करीत आहात.अशाच ध्येयाने प्रेरित 'बसव' पथावरील कार्यरत कार्यकर्त्यांचा सन्मान व्हावा, त्यांच्या कार्यातून अनेकांना प्रेरणा व ऊर्जा मिळावी. म्हणून आम्ही गौरव करतो. केवळ 'व्यक्ती म्हणून नव्हे, तर तो आपल्या कार्याचा व विचारांचा गौरव आहे. आपल्या सन्मानजनक कार्यामुळेच आपली समाजाला स्वतंत्र ओळख होवून आपणास मान, सन्मान व प्रतिष्ठा प्राप्त झालेली आहे.हेच कार्य आपण अखेरपर्यंत करीत राहाल, अशी अपेक्षा आहे. "माझ्यासह लहान कोणी नाही, शरणापेक्ष महान कोणी नाही." "मला ब्रह्मपद नको, मला विष्णुपद नको, मला रूद्रपद नको, नको मला कोणतीच पदवी, मला हवी आहे.शरणांच्या सेवेची महापदवी कूडलसंगमदेवा." अशा शब्दात शरणांचा गौरव महात्मा बसवण्णांनीसुद्धा केलेला आहे. म्हणून आम्ही डॉ. भीमराव ब्रह्माजीराव पाटील यांनी विद्यावाचस्पती पदर्व प्राप्त केल्याबद्दल त्यांच्या सन्मान सोहळ्याप्रसंगी महाराष्ट्र,कर्नाटक, तेलंगणा, आंध्रप्रदेश व गुजरात या पाच राज्यातील शरणांचा शरण गौरव सोहळा' आयोजित केलेला आहे.आपल्या समाजसेवा कार्याबद्दल हा पुरस्कार देण्यात येत आहे.असा गौरव करून  तुकाराम माळी यांना शरण सेवा समिती लातूरच्या वतीने पुरस्कार देण्यात आला आहे.

 

जत येथील तुकाराम माळी यांना शरण सेवा समिती लातूरच्या वतीने समाज "दासोही" पुरस्काराने गौरविण्यात आले.

Blogger द्वारे प्रायोजित.