Header Ads

उच्चदाब वितरण प्रणालीवरील जोडण्या | सप्टेंबरपर्यंत पूर्ण करणार - ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत


            मुंबई : राज्यात ज्या शेतकऱ्यांनी कृषीपंपासाठी वीज जोडणीचे अर्ज केले आहेत ते पूर्ण करण्यासाठी कमी उच्चदाबाच्या वाहिनीवरुन देण्याबाबत प्रयत्न केले जातील, असे ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांनी आज विधानसभेत सांगितले.परभणी जिल्ह्यातील महावितरण कंपनीच्या उच्चदाब प्रणाली अंतर्गत कामे अपूर्ण असल्याबाबतचा प्रश्न सदस्य डॉ.राहूल पाटील यांनी उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना डॉ.राऊत म्हणाले, परभणी जिल्ह्यात या योजनेंतर्गत डिसेंबर अखेर 3 हजार 963 कृषीपंपांपैकी 1442 पंपांना वीज जोडणी देण्यात आली. जानेवारी 2020 अखेरपर्यंत नव्याने 1705 जोडण्या देण्यात आल्या. 2278 कामे प्रगतीपथावर असल्याचे डॉ.राऊत यांनी सांगितले.दरम्यान एका उपप्रश्नाला उत्तर देताना ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी सांगितले की, परभणी जिल्ह्यातील पेड पेंडींगची कामे सप्टेंबरअखेर पूर्ण करण्यात येतील.यावेळी झालेल्या चर्चेला उत्तर देत असताना मंत्री डॉ.राऊत म्हणाले, उच्चदाब वितरण प्रणालीतून देण्यात येणाऱ्या जोडणीसाठी सध्या मुदतवाढ दिली आहे. मुदत संपली तरी या प्रणालीच्या जोडण्या कमी दाबाच्या प्रणालीवरुन देऊन शेतकऱ्यांना लाभ दिला जाईल. दरम्यान या संदर्भात सविस्तर बैठक घेण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री अनिल बाबर, सुधीर मुनगंटीवार, विनय कोरे यांनी भाग घेतला.


Blogger द्वारे प्रायोजित.