Header Ads

| जत | नगरसेवक सहलीत,नागरिक सलाईनवर | कारभार सुधारा : सचिन मदनेचा आंदोलनाचा इशारा


 
 

 

नगरसेवक सहलीत,नागरिक साईनवर

 

कारभार सुधारा : सचिन मदनेचा आंदोलनाचा इशारा

जत,प्रतिनिधी : जत शहरातील जनतेला कोणी वाली राहिलेला नाही. जत शहरातील अनेक भागांमध्ये गटारी तुंबलेल्या आहेत तर काही भागांमध्ये कचऱ्याचे डेपो झालेले आहेत,यामुळे  शहरावर डासांची दहशत वाढून डेंगू, मलेरिया अशा साथी वाढू लागल्या आहेत.अनेक नागरिक सलाईनवर असून जत नगरपालिकेचे नगरसेवक मात्र  हवामान बदलण्यासाठी सहलीवर गेले आहेत.

जत शहरातल्या जनतेनी ह्या नगरसेवकांना एक मोठ्या आशेने अपेक्षेने निवडून दिले. शहराची सेवा करण्यासाठी ह्या नगरसेवकांना संधी दिली,पण हे नगरसेवक तोंड बघायलाच सुद्धा शहरांमध्ये दिसत नाहीत.

महिला नगरसेविकांच्या पती राजाने हिरारीने सहलीमध्ये सहभाग घेतला आहे.महिला नगरसेविकाना जनतेतून बहुमतांनी निवडून दिले पण या महिला नगरसेविका नगरपालिकेत येत नसून या महिला नगरसेविका घरातच या नगरसेविकांचे पतिराज शासकीय कामांमध्ये व कर्मचाऱ्यांना त्रास देतात त्यामुळे या महिला नगरसेविका फक्त नामधारी असून त्यांचे पतिराज हेच कारभारी आहेत. महिला दिनाच्या पूर्व संध्येला ही एक शोकांतिका आहे.

नगरपालिकेचे वार्षिक दहा ते बारा कोटींचे बजेट असते. दर महिन्याला मासिक मीटिंग बोलावली जाते. पण जत शहराच्या विकासकामासाठी कोणीही या मीटिंगमध्ये चर्चा करत नाहीत.या मिटिंग मध्ये व्यवस्थित चर्चा करून विकास कामांचे नियोजन करणे गरजेचे असते परंतू नगरपालिकेमध्ये एकच विषय असतो, तो म्हणजे ऐकमेकांची जिरवा जीरवी याच्या पलीकडे कोणतीही चर्चा होत नसून फक्त नगरपालिकेमध्ये असे  राजकारण सुरू आहे.

नगरपालिकेची 28 फेब्रुवारी रोजी मासिक मीटिंग असून नगरसेवक सहलीवर आहेत.जत शहरांमध्ये अनेक ठिकाणी पाण्याचे लीकेज असल्यामुळे अनेक भागांमध्ये अपुरा पाणीुरवठा होत आहे.त्यामुळे जनतेला त्रास होत आहे

जत शहरातून जाणाऱ्या विजापूर ते गुहागर राज्य महामार्गाचे काम आजी-माजी आमदारांच्या राजकीय साठमारीत प्रलंबित राहिलेले आहेत. या नाहक त्रास जत शहरातील सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे.ही कामे तातडीने न झाल्यास आम्ही रस्त्यावर उतरून पक्ष विहिरीत जनतेच्या हितासाठी तीव्र आंदोलन करू असा इशारा मदने यांनी दिला.
 


 

Blogger द्वारे प्रायोजित.