Header Ads

जत | जतेत 4 ते 8 मार्च दरम्यान "भव्य कृषी प्रदर्शन" | स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आयोजन


जत,प्रतिनिधी : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जत येथे राज्यस्तरीय "शिवार भव्य कृषी प्रदर्शन" बुधवार दिनांक 4 मार्च ते रविवार दिनांक 8 मार्च या कालावधीत जत येथील आर आर कॉलेज रस्त्यावरील पशू वैद्यकीय दवाखान्याच्या मैदानावर आयोजित करण्यात आले आहे,अशी माहिती जिल्हा अध्यक्ष महेश खराडे यांनी दिली 


 सदर प्रदर्शनात 5.मार्च रोजी पशू प्रदर्शन सकाळी 10 ते 6 या वेळेत होणार आहेे. विजेत्यांना आकर्षक बक्षिषे दिली जाणार आहेत.शुक्रवार दिनांक 6 मार्च रोजी दुपारी तीन ते सात या वेळेत डॉग शो होणार आहे.तसेच प्रदर्शनाला भेट देणाऱ्या सर्व शेतकरी व लोकाची मोफत डोळे तपासणीची सोय करण्यात आली आहे.त्याच बरोबर पशू प्रदर्शनात येणाऱ्या सर्व जनावराचे मोफत लसीकरण करण्यात येणार आहे.
प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण भारतातील सर्वात बुटकी गाय असणार आहे,याशिवाय सर्व नामवंत कंपन्याचे शेती व शेती पूरक उत्पादनाचे 200 स्टॉल मांडण्यात येणार आहेत.तसेच ट्रॅक्टर ,चारचाकी गाड्या अवजारे याचेही दालन उपलब्ध आहे गृहउपयोगी वस्तूचे स्वंतत्र दालन आहे.या प्रदर्शनाचा लाभ शेतकऱ्यांच्या सह सर्वांना होणार आहे.त्याच बरोबर रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे यांचा कपड्याच्या विशेष योजनासह मोठा स्टॉल प्रदर्शनात असणार आहे.त्यात स्वस्त आणि गुणवत्ता पूर्ण कपडे खरेदी करण्याचा आनंद लुटता येणार आहे.सवदे उद्योग समूह व ऐश्वर्या कृषी सेवा केंद्र डफळापूर व जत याचांही स्टॉल मांडण्यात येणार आहे.यु एस के अग्रो सायन्सेस या कंपनीची सर्व उत्पादन हे प्रदर्शनाचे खास आकर्षण ठरणार आहे. याशिवाय मराठा पब्लिक स्कूल निगडी खुर्द, खंडेराजुरी, पन्हाळा येथे सुरू असलेल्या शैक्षिणक कार्याची माहिती देणारे दालन या ठिकाणी असणार आहे.या प्रदर्शन कृषी, आरोग्य,व शैशनिक श्री त्रासाठी उपयोगी ठरणार आहे त्यामुळे या प्रदर्शनाचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा असे आवाहन खराडे यांनी केले आहे प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी तालुका अध्यक्ष रमेश माळी दुंदाप्पा बिराजदार,सुरेश घागरे,भिमाना बिराजदार शंकर गडग,कादाप्पा धनगोंड, नागाप्पा शिलीन आबासाहेब गावडे,पिंटू मोरे यांच्यासह सर्व कार्यकर्ते झटत आहेेत.


Blogger द्वारे प्रायोजित.